मुंबई- अलीकडेच ट्विटर सोडण्याची धमकी देणारी दिवस- रात्र ट्विटरवरच सक्रिय असते. आता तिने मंगोलपुरी, दिल्ली येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांच्या हत्येबद्दल ट्वीटही केलं आहे. कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटल्यावर लिंचिंग करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
‘या वडिलांच्या वेदनेचा थोडा विचार करा आणि आपल्या मुलांबद्दल किंवा कुटुंबातील सदस्यांबद्दल विचार करा. अजून एक दिवस, अजून एका हिंदूला फक्त जय श्री राम म्हटलं म्हणून लिंचिंग करण्यात आलं.’ कंगनाने #Justiceforrinkusharma चे समर्थन करत आवाज उठवला आहे.
टाइम्स नाऊशी बोलताना रिंकूची आई राधा शर्मा म्हणाल्या की तिने आदल्या रात्री माझा मुलगा त्याच्या मित्राच्या वाढदिवसाच्या मेजवानीला गेला होता. तिथून तो घरी आला. थोड्यावेळाने काही अज्ञात व्यक्ती आले. त्याला घरातून फरफटत नेलं आणि त्याच्यावर चाकूने वार केले. ते पुढे म्हणाले की, ‘त्याचं इतकं रक्त वाहत होतं की संपूर्ण रस्ता त्याच्या रस्क्ताने भरला होता.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times