माला यांचा गौतमनगर परिसरात चहाविक्रीचा व्यवसाय आहे. २५ जानेवारीला राज मंदी हा तेल विकण्याच्या बहाण्याने गौतमनगरमध्ये आला. तो माला यांना भेटला. ‘तुमच्या मुलावर जादूटोणा करण्यात आला, पूजा केल्यानंतर भूतबाधा संपेल. यासाठी चार लाखांचा खर्च येईल’, असे सांगितले. त्यानंतर तो रंजितला घेऊन आला. रंजितने पूजा केली. माला यांनी त्यांना एक लाख रुपये दिले. काही दिवसांनी मंदी पुन्हा माला यांना भेटला. त्याने माला यांना ३ लाख रुपये मागितले. त्यांनी परिसरातील नागरिकांना याबाबत सांगितले. परिसरातील नागरिकांनी माला यांच्यासह गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी सापळा रचून मंदी याला अटक केली. त्याची चार दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
मारहाण करून युवकाला लुटले
नागपूर: भिलगाव परिसरात दोघांनी अक्षय सुरेश करंडे (२७, रा. येरखेडा) याला मारहाण केली. लुटारूंनी त्याच्याकडील एक हजाराची रोख व मोपेड हिसकावली. ही घटना १० फेब्रुवारीला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
बसमधून दागिने चोरी
भंडारा-नागपूर बसने प्रवास करताना तीन महिलांपैकी एकीने निशा धनराज गजभिये (३२ रा. भंडारा) यांच्या पर्समधून रोख रकमेसह ५५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी केले. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. गजभिये यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
विवाहितेची आत्महत्या
नागपूर : कौटुंबिक कलहातून विवाहितेने जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना बजेरियातील लोधीपुरा येथे उघडकीस आली. तृप्ती हर्षकुमार शाहू (वय ३१) असे मृतकाचे नाव आहे. ६ फेब्रुवारीला अंगावर रॉकेल ओतून त्यांनी जाळून घेतले. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times