चेन्नई: at chennai भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून (१३ फेब्रुवारी) सुरूवात होणार आहे. पहिल्या कसोटीत भारताच २२७ धावांनी पराभव करत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ( )ने शानदार द्विशतकी खेळी केली होती. १००व्या कसोटीत द्विशतक करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला होता. आता दुसऱ्या कसोटीत देखील त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. त्याने सलग ३ कसोटीत शतक झळकावले आहे.

वाचा-

पहिल्या कसोटीत इंग्लंडने रूटच्या द्विशतकाच्या जोरावर ६००च्या जवळ मजल मारली होती. त्यानंतर पहिल्या डावात आघाडी घेतली. रूट सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे आणि तो भारतीय संघासाठी डोकीदुखी ठरू शकतो. रूटला लवकर बाद केल्याच इंग्लंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखता येऊ शकते.

वाचा-

चेन्नत झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नव्हती. उद्यापासून होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत जो रूटला बाद करण्यासाठीचा प्लॅन बांगलाचा क्रिकेटपटू ( )ने शेअर केला आहे. तिवारीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १५ सामने खेळले आहेत. त्याने सोशल मीडियावर एक चार्ट शेअर केला आहे.

वाचा-

या चार्टमध्ये त्याने रुटला बाद करण्यासाठी कशा प्रकारची फिल्डिंग लावयची याची योजना केली आहे.

वाचा-

तिवारीच्या या योजनेनुसार आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत असताना जो रूटसाठी सात खेळाडू ऑन साइडला तर दोन खेळाडू ऑफ साइडला ठेवले जावेत. त्याच्या या योजनेनुसार स्लिपमध्ये खेळाडू ठेवण्याची गरज नाही.

रुटने पहिल्या सामन्यात २२८ धावा केल्या होत्या. त्याच्या या द्विशतकामुळेच इंग्लंडने ५७८ धावा केल्या. त्यानंतर सामना २२७ धावांनी जिंकला.

वाचा-

मनोज तिवारीने भारताकडून १२ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. वनडेत त्याने एक शतक आणि अर्धशतकासह २८७ तर टी-२० मध्ये १५ धावा केल्या आहेत. २०१५ साली त्याने भारताकडून अखेरची मॅच खेळली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here