नवी दिल्ली: भारताची जमीन चीनच्या ताब्यात दिल्याचा ( ) आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी ( ) यांनी केला. त्यांच्या या आरोपावर संरक्षण मंत्रालयाने ( ) उत्तर दिलं आहे. भारताचा भूभाग पँगाँ सरोवराच्या ( ) फिंगर ४ पर्यंत आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. भारताच्या नकाशात चीनच्या ताब्यात असलेला भारताचा भूभागही आहे. हा भूभाग सुमारे ४३,००० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ इतका आहे, असं संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

भारताच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष ताबा रेषा ही फिंगर ४ पर्यंत नाही तर फिंगर ८ पर्यंत. याच कारणाने फिंगर ८ पर्यंत पेट्रोलिंग करण्याची मागणी भारत सातत्याने करत आला आहे आणि चीनबरोबरही हा करार आहे. हॉट स्प्रिंग्स गोगरा आणि डेप्सांग व्हॅलीमधील वादही सोडवला जाईल. पाँगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य माघारीनंतरच्या ४८ तासांनी या भागांमध्येही पूर्वीची स्थिती बहार करण्यावर चर्चा सुरू केली जाईल, असं संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला भारतीय प्रदेश का दिला? याचे उत्तर त्यांनी आणि संरक्षणमंत्र्यांनी द्यावे. लष्कराला कैलास पर्वत रांगांमधून माघार घ्यायला का सांगितले गेले आहे? डेप्सांग प्लेन चीनकडून परत का मागितले नाही? आपली जमीन फिंगर – ४ पर्यंत आहे. पंतप्रधान मोदींनी फिंगर -३ पासून ते फिंगर ४ पर्यंतची जमीन चीनला दिली आहे. पंतप्रधान मोदी चीनविरूद्ध ठामपणे उभे राहू शकत नाहीत. ते आपल्या जवानांच्या बलिदानाचा अपमान करत आहेत. भारतात कोणालाही असे करण्यास परवानगी देऊ नये. पंतप्रधान मोदी यावर का बोलत नाहीत?, असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले.

भारत-चीनमधील तणावावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संसदेत निवेदन दिलं. भारत आणि चीनने पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरून सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. दोन्ही देशांचे आघाडीवरील तैनात सैनिक पँगाँग सरोवराच्या काठावरुन मागे हटण्यास सुरवात झाली आहे. दोन्ही देशां गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सीमेवर तणाव सुरू झाला होता. चिनी सैनिक प्रत्यक्ष ताबा रेषेत घुसल्याचे त्यावेळी भारताने सांगितले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here