‘काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, यापुढं काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार,’ असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आज मरिन ड्राइव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. त्यावेळेस नाना पटोले बोलत होते.
वाचाः
‘महाराष्ट्रात आज जी लाट दिसत आहे ती परिवर्तनाची लाट आहे. केंद्रातील हुकूमशाही सरकारविरोधातील परिवर्तनाची लाट. मुंबईत महात्मा गांधींनी परकीयांना बाहेर काढण्याचा जो विचार मांडला तोच विचार आम्ही मांडत आहोत. देशातील हुकूमशाही मोदी सरकारविरोधात चले जावची घोषणा आम्ही देणार आहोत,’ अशी टीका पटोले यांनी केली आहे.
वाचाः
‘नरेंद्र मोदींनी देशाच्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आंदोलनावर टीका केली. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप केलं. या माध्यमातून आम्ही देशाच्या अन्नदात्याचा अपमान करेल त्याच्याविरोधात या पद्धतीची व्यवस्था निर्माण केली जाईल असा संदेश आम्ही देत आहोत,’ असा घणाघातही त्यांनी केला आहे.
‘देशात इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. यावरही नाना पटोले यांनी लक्ष वेधलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानादेखील पेट्रोलचे दर १०० रुपयांपर्यंत गेले आहेत. देशातील जनतेची लूट सुरु आहे,’ असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times