२०२० मध्ये, करोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाइनमध्ये, लिसा हेडनने ‘स्टेट अॅट होम’ म्हणून मालिका सुरू केली होती. या मालिकेत ती तिच्या चाहत्यांना स्वतःच्या नित्यकर्मांबद्दल सांगायची. या मालिके दरम्यान लिसाने तिच्या स्टायलिश आणि आलिशान घराचे फोटो दाखवले. यासोबतच तिने घराचे काही व्हिडिओही शेअर केले होते.
अभिनेत्री
तिसऱ्यांदा आई होणार आहे. सोमवारी तिने इन्स्टाग्रामने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. लिसा म्हणाली की, बाळ जूनमध्ये जन्माला येईल. आधीच तिने गरोदरपणाची घोषणा का केली नाही याचं कारण सांगताना ती म्हणाली की, फक्त आळसामुळेच तिला ही गुड न्यूज द्यायला उशीर झाला.
व्हिडिओत लिसा हेडन आपल्या मुलाला विचारते की मम्मीच्या पोटात काय आहे ते तू सर्वांना सांगू शकतो का? यावर जॅक आनंदाने उत्तर देतो की, माझी बहीण. लिसा आणि तिचा नवरा डिनो लालवानी यांना लिओ नावाचा अजून एक मुलगा आहे. दोन मुलांची आई लिसा हेडन फार फिट आहे.
लिसाने २०१६ मध्ये डिनो लालवानीशी लग्न केलं. २०१७ मध्ये तिने मोठा मुलगा जॅकला जन्म दिला आणि २०२० मध्ये दुसरा मुलगा लिओला जन्म दिला. लिसा हेडनने ‘आएशा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय तिने ‘हाऊसफुल ३’, ‘द शौकीन’, ‘क्वीन’, ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमांमध्ये काम केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times