मुंबईः आज राज्यात ३ हजार ६७० बाधित रुग्णांची नोंद झाली असून ३६ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. ()

राज्यातील करोना रुग्णांच्या आकडेवारीत सातत्याने चढ- उतार होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असली तरी राज्याचा रिकव्हरी रेट दिलासा देणारा आहे. तसंच, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची कमी होणारी संख्या ही आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं चिन्ह आहे.

वाचाः

आज राज्यात २ हजार ४२२ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं करोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा १९ लाख ७२ हजार ४७५ इतका झाला आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५. ९१ टक्के इतके झाले आहे. तर, आज राज्यात ३६ रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला असून एकूण करोना मृतांचा आकडा ५१ हजार ४५१ पर्यंत पोहोचला आहे.

वाचाः

अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली

राज्यात सध्या ३१ हजार ४७४ अॅक्टिव्ह रुग्ण उरले असून राज्यातील विविध रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईत सध्या ३ हजार ८८१ सक्रीय रुग्ण आहेत. तर, पुण्यात सर्वाधिक ५ हजार ७६ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यात एकूण ४ हजार ५१९ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here