नवी दिल्लीः लोकसभेचे कामकाज उद्या सकाळी १० वाजता सुरू होईल. अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर उद्या सभागृहात चर्चा होईल. यापार्श्वभूमीवर भाजपने खासदारांना ( ) तीन लाइनचा व्हीप जारी केला आहे. काही महत्त्वपूर्ण अर्थ विधेयकांवर लोकसभेत उद्या १३ फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी चर्चा होईल आणि ते सभागृहात मंजूर केले जाऊ शकतात. लोकसभेतील सर्व भाजप सदस्यांनी उद्या सकाळी १० वाजेपासून सभागृहात सकारात्मकपणे उपस्थित रहावं आणि सरकारला पाठिंबा द्यावा, अशी सूचना पक्षाने केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्रातील शेवटचा दिवस

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आजच सभागृहाला माहिती दिली. लोकसभेचं कामकाज उद्या १३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता सुरू होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा २९ जानेवारीपासून ते १३ फेब्रुवारी चालेल. तर दुसऱ्या टप्प्याट ८ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत संसद अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे. राज्यसभेचं पहिल्या टप्प्यातील कामकाज शुक्रवारी संपुष्टात आलं. त्यानंतर राज्यसभा आता ८ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. यामुळे शनिवारी राज्यसभेचं कामकाज होणार नाही. लोकसभेचं कामकाज उद्या सकाळी १० वाजेपासून सुरू होईल. शनिवारी १३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता लोकसभेचं कामकाज सुरू होईल, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं.

करोना व्हायरसमुळे कामकाजात बदल

करोना व्हायरसमुळे संसदेत लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज एकाचवेळी घेण्यात आलं नाही. राज्यसभेचं कामकाज सकाळी घेण्यात आलं. तर लोकसभेचं कामकाज दुपारून घेतलं गेलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज सुरू होण्याची वेळ सकाळी नऊ वाजता होती. तर लोकसभेचं कामकाज सुरू करण्याची वेळ दुपारी चार वाजेची होती. करोना व्हायरसमुळे दोन्ही सभागृहात बसण्याची व्यवस्था खासदारांना करण्यात आली होती. तसंच प्रत्येक खासदारादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं गेलं. सामान्यतः संसदेत दोन्ही सभागृहांचं कामकाज हे सकाळी ११ वाजता सुरू होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here