म.टा. प्रतिनिधी, नागपूर: कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन याच्यासह पाच बंदीवानांना करोनाची लागण झाल्याचे अलीकडेच स्पष्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी त्यांना मेडीकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या सगळ्यांच्या वैद्यकीय अहवालानुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांची रवागनी कारागृहात करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी अरुण गवळीची प्रकृती खालावली. त्याच्यासह अन्य बंदीवानांची करोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल बुधवारी आला. यात गवळीसह पाचजणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पाचही जणांचे कारागृहात वेगवेगळ्या बॅरेकमध्ये विलगीकरण करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पाचही जणांची प्रकृती स्थिर होती. करोनाबाधित बंदीवानांमध्ये कुख्यात शेखूचाही समावेश असून अन्य तिघे कच्चे कैदी आहेत.

वाचाः

दरम्यान, शुक्रवारी सकाळी या सगळ्यांना मेडीकलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी तसेच अन्य काही चाचण्या करण्यात आल्या. वैद्यकीय अहवालानुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आल्याने त्यांना कारागृहात परत पाठविण्यात आले.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here