मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली असली तरी काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच प्रदेश उपाध्यक्षा यांनी थेट या मंत्र्याचे नाव घेत आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ( )

वाचा:

पूजा चव्हाण ही तरुणी टिक टॉकमुळे प्रकाशझोतात आली होती. सोशल मीडियात तिचा मोठ्या संख्येने फॅन फॉलोअर आहे. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी ती परळी वैजनाथ येथून पुण्यात आली होती. पुण्यातील वानवडी भागात ती वास्तव्याला होती. तिच्यासोबत तिचा भाऊ आणि एक मित्रही होता. ८ फेब्रुवारी रोजी पूजाने इमारतीतून उडी घेऊन आत्महत्या केली. तिने तणावातून हे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले होते. मात्र, गेले दोन दिवस याअनुषंगाने १० ते १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून त्यातून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या क्लिपमध्ये ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांचं संभाषण असल्याचा मुद्दा उचलत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षनेते यांनी आज राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना पत्र लिहून याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपही पोलीस महासंचालकांकडे पाठवल्या आहेत. फडणवीस यांनी आपल्या पत्रात संबंधित मंत्र्याचा नामोल्लेख टाळला होता. मात्र चित्रा वाघ यांनी थेट नाव घेऊन निशाणा साधला आहे.

वाचा:

‘पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी जे काही अपडेट्स समोर येत आहेत, ते पाहता सर्वाचा रोख शिवसेनेचे मंत्री यांच्याकडे आहे. त्यामुळे पोलिसांनी आता स्यु-मोटो दखल घेत तक्रार नोंदवून घ्यायला हवी व मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा’, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. राज्याचे गृहमंत्री सध्या ‘संजय’च्या भूमिकेत गेले आहेत. जे दिसेल ते पाहावे, सहकारी सत्ताधाऱ्यांना कथन करावे आणि त्यांना क्लीनचिट देत पुढे चालावे, असा त्यांचा दिनक्रम आहे. पूजा चव्हाण प्रकरणात मोबाइलमधील संभाषणाचा मोठा पुरावा समोर आला आहे. त्यात तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला. मग तिने आत्महत्या केल्यावर तिचा मोबाइल ताब्यात घेण्याची सूचना कथित मंत्र्याने अरुण नावाच्या व्यक्तीला दिली. या क्लिप सगळ्यांनी ऐकल्या आहेत. अशावेळी पोलीस आणखी कोणत्या पुराव्याची वाट पाहत आहेत. कदाचित पूजा चव्हाणच्या कुटुंबावर दबाव असू शकेल, पण पोलिसांनी त्यापुढे जाऊन उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर कारवाई करायला हवी. मात्र, या सर्वासाठी राजकीय इच्छाशक्तीही तितकीच महत्त्वाची आहे. हे काम मुख्यमंत्र्यांचे आहे. त्यांनी संबंधितांच्या मुसक्या आवळायला सांगायला हवे. आरोपींच्या मुसक्या आवळायच्या सोडून ते कसली वाट पाहत आहेत?, असा सवालच चित्रा वाघ यांनी केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here