नवी दिल्लीः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात ( ) आंदोलन ( ) करणारे शेतकरी नेते ( ) यांनी आता मोठी घोषणा केली. राकेश टिकैत यांनी थेट केंद्र सरकारलाच आव्हान दिले आहे. आता देशभरात मार्च काढणार आणि गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार, असं राकेश टिकैत म्हणाले.

केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन ७९ दिवसांपासून सुरू आहे. पण त्यावर अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. हे आंदोलन दीर्घ काळ चालण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.

हरयाणाच्या बहादूरगडमध्ये किसान महापंचायत आयोजित करण्यात आली होती. यात देशभरात मार्च काढण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली. तसंच गुजरातला मुक्त करू. कारण गुजरात हे केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे. भारत स्वतंत्र आहे. पण गुजरातमधील जनता ही कैदेत आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना तुरूंगात टाकलं जातयं, असा आरोप टिकैत यांनी केला.

‘सरकारशी चर्चेसाठी तयार’
नवीन कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय घर वापसी नाही. आमचा मंच आणि पंच बदलणार नाही. सिंघू सीमे आमचे कार्यालय कायम राहील. आम्ही सरकारसोबत आजही चर्चेला तयार आहोत आणि १० दिवसांनी किंवा पुढच्या वर्षी चर्चा करायची असेल तरही आमची तयारी आहे. खिळे उपटल्याशिवाय आम्ही दिल्लीहून परतणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

‘राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत’

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर गुरुवारी लोकसभेत निशाणा साधला. चार जण देश चालवत आहेत. हम दो आणि हमारे दो, असं हे सरकार असल्याचं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या या विधानाशी सहमत असल्याचं टिकैत म्हणाले. खरंच असं वाटतं, अशी प्रतिक्रिया टिकैत यांनी दिली.

शेतकऱ्यांची दीर्घ आंदोलनासाठी तयारी

कडाक्याच्या थंडीनंतर आता शेतकऱ्यांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. यामुळे त्यांच्या तंबूत पंखे बसवले जात आहेत. यासह, मंडपाची उंची वाढवून, उन्हाचा कडाका टाळण्यासाठी त्याच्या आणखी एक तंबू टाकला जात आहे. यासह आंदोलनाच्या ठिकाणी एसी ट्रॉल्याही दिसून येत आहेत. हे आंदोलन किमान ऑक्टोबरपर्यंत चालेल, असा अंदाज शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here