प्रचंड वर्दळीच्या रस्त्यावर कोब्रा आला होता. कोब्राला रस्त्यावरून जात असलेलं पाहून पोलिसाने चौकातील सर्व बाजूची वाहतूक थांबवली. रस्त्यावर आलेल्या दुर्मिळ पाहुण्याला पाहून सर्वच स्तब्ध झाले. तर कडक उन्हामुळे सिमेंट काँक्रीटच्या तापलेल्या रस्त्यावरून जाता क्रोब्रा होरपळत असल्याचं दिसून आलं.
रस्त्यावरून वाट काढणाऱ्या कोब्राचे फोटो आणि व्हिडिओ काही वाहन चालक काढत होते. एका चालकाने आणि पोलिसांनी कोब्राला रस्त्यावरून जाताना बघताच तातडीने रस्त्यावरील वाहतूक थांबवली. अन्यथा कोब्रा चिरडला गेला असता. वर्दळीच्या रस्त्यावर आर्धा तास चाललेली कोब्राची धडपड पाहून एक चांगली व्यक्ती समोर आली. त्याने कोब्राला पकडलं आणि लगेचच उपचारासाठी नेलं.
वाहतूक रोखून ठेवल्यामुळे कोब्राला कुठलीही दुखापत झाली नाही. तसंच कोब्रामुळे इतर कुणालाही इजा झाली नाही, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times