जळगाव: प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी व तत्कालीन अवसायक यांनी ३० दिवसांच्या आत पोलिसांना शरण यावे अन्यथा त्यांना या गुन्ह्यात फरार घोषित करण्यात येणार असल्याचे घोषणापत्र प्रसिद्ध करण्याचे आदेश पुणे विषेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पुणे पोलिसांच्या पथकाकडून झंवर व कंडारे यांच्या घरांसह इतर ठीकाणी तशा नोटिशी आज चिकटवण्यात आल्या आहेत. ( )

वाचा:

बीएचआर सोसायटीतील अवसायकच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशी वर्ग करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या उपायुक्त यांच्यासह पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात येवून सीए महावीर जैन, प्रकाश वाणी, विवेक ठाकरे, धरम साखला, कमलाकर कोळी यांना अटक केली. यांनतर २२ जानेवारी २०२१ रोजी सुनील झंवर याचा मुलगा सूरज याला अटक केली.

वाचा:

गुन्हे दाखल झाल्यापासून प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवर व तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे हे दोघे बेपत्ता झालेले आहेत. पोलिसांनी राज्यभरात त्यांचा शोध घेतल्यानंतरही ते मिळून आले नाहीत. दरम्यान, या दोघांना फरार घोषित करावे, अशी मागणी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात केली आहे. त्या अनुषंगाने कागदपत्रे तयार करुन न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. त्यावर पुण्याच्या विषेश न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी न्यायालयाने यावर आदेश दिले. झंवर व कंडारे यांनी ३० दिवसांच्या आत पोलिसांना शरण यावे अन्यथा त्यांना फरार घोषित करण्यात येईल असे घोषणापत्र प्रसिद्ध करण्याचे आदेशात म्हटले आहे. या आशयाच्या नोटिशी पुणे पोलिसांच्या पथकाने लगेचच सुनील झंवर व जितेंद्र कंडारे यांच्या घरांसह काव्यरत्नावली चौक, टावर चौक, शहर पोलीस ठाणे आदी ठीकाणी चिकटवल्या आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here