वाचा:
ठाण्याच्या हद्दीतील उमरेड बस स्थानकाजवळील परिसरात हा प्रकार घडला. राजू गुप्ता यांचे शहरातील नंदनवन परिसरात हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही विविध आजारांनी ग्रस्त होते. त्यामुळे त्यांचा औषधांवरील खर्च वाढला होता. आजारपण आणि औषधांसाठीचा खर्च यामुळे दोघेही नैराश्यात होते, असे कळते. त्यांचा मुलगा विक्की काही कारणाने शहरात आला होता. यावेळी दोघेही घरी एकटेच होते. दोघांनी विषप्राशन करून आपले आयुष्य संपविले. आजारपण आणि वाढता आर्थिक ताण याला कंटाळून या दाम्पत्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आई-वडिलांच्या आत्महत्येने दोन्ही मुलांवर मोठा आघात झाला आहे.
आणखी वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times