तपासणीत घोळ करणारे आरोग्य कर्मचारी आणि अधिका्ऱ्यांना निलंबित करण्यात आल आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक टीमही तयार करण्यात आली आहे. जमुईत सिकंदरा आणि बारहाटमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे वृत्त आहे. तपासात ते खरं असल्याचं आढळून आलं आहे. जमुईचे सिव्हिल सर्जन विजेंद्र सत्यार्थी, डीपीओ सुधांशु लाल यांच्यासह पाच अधिका्यांना निलंबित करण्यात आले आहे. इतर अनेक आरोग्य कर्मचार्यांवरही कारवाई करण्यात आली आहे, असं पांडेय यांनी सांगितलं.
बिहारमध्ये करोना चाचणीशी संबंधित घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत आणि त्यांचा तपास सुरू आहे. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर तपास करावा अशा सूचनाही दिल्या आहेत. काही जिल्ह्यात घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. आता संपूर्ण राज्यात यासंबंधी चौकशी केली जात आहे. ज्यानेही घोळ घातला असेल, त्याला सोडणार नाही, सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं मंगल पाड्ये यांनी सांगितलं.
जमुईच्या बरहाट प्राथमिक केंद्रात ४८ रुग्णांपैकी २८ जणांचा मोबाइल क्रमांक हा 0000000000 (१० शून्य ) असा लिहिलेला आहे. जमुईतही १५० नोंदींपैकी ७३ मोबाइल नंबरसाठी १० शून्यांचा उपयोग केला गेला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times