नागपूर: अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या पतीचा खून करणाऱ्या महिलेला तिच्या प्रियकरासह अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. पतीच्या मृत्यूबाबत पोलीसांना कळवल्यानंतर ही महिला पसार झाली होती. तिथेच पोलिसांचा संशय बळावला होता. ( )

वाचा:

(वय ४७, रा. दंतेश्वरनगर) असे मृताचे तर (३८) आणि (वय २५) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना शहरातील ठाण्याच्या हद्दीत ८ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता उघडकीस आली होती. शेखर व सरिता यांना दोन मुली आहेत. ते कुटुंबासह शारदानगरात राहात होते. मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे तर दुसऱ्या मुलीचा पाच महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेखर यांची मन:स्थिती ठीक नव्हती.

वाचा:

कनोजिया दाम्पत्य कपडे इस्त्री करण्याचे काम करायचे. सरिताची वस्तीतीलच पंकजसोबत ओळख झाली. त्यातून पंकजचे घरी येणे-जाणे सुरू झाले. दोघांचे संबंध शेखरला खटकले. यातून त्याचे सरिताशी खटके उडू लागले. त्याने पंकजलाही घरी येण्यास मनाई केली. मात्र, त्यांचे अनैतिक संबंध सुरूच होते. त्यामुळे शेखर कधीकधी भावाकडे राहण्यास जात असत. ७ फेब्रुवारी रोजी ते घरी परतले. त्यावेळी घरी त्यांना पंकज दिसला. यावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यातूनच सरिता आणि पंकज या दोघांनी शेखर यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांचा खून केला. घटनेनंतर दोघेही पसार झाले होते. पोलिसांनी शुक्रवारी या दोघांना अटक केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here