जालनाः जालनाहून बुलढाण्याकडे ब्रीजा सुझुकी एमएच २२, एएम २७०१ ही गाडी चालकाचा ताबा सुटल्यामुळे जामवाडी शिवारातील युवराज धाब्यासमोरील रस्त्याच्या विहिरीत जाऊन पडली. सायंकाळी ६.३० ते पावणे सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यात दोन जण ठार झाले असून एका मृतदेहाच्या खिशातील आधार कार्डवरुन मयताचे नाव अब्दुल मन्नान शेख सगीर रा. बीड असे असून बीडमधील सागर फॅब्रीकेशन या प्रसिद्ध दुकानाचे मालक होते. तर दुसऱ्या मयताचे नाव अझहर कुरैशी असे आहे. काठोकाठ भरलेल्या विहिरीत ही गाडी पडल्यामुळे जालना पोलिसांना बचावात अडथळे आल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांनी दिली. उशीरापर्यंत बचावकार्य चालू होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times