म. टा. प्रतिनिधी,

घोडबंदर मार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या खारेगाव टोलनाका ते गायमुख चौपाटीपर्यंतच्या कोस्टल रोडचा सविस्तर प्रकल्प आराखड्यास (डीपीआर) ठाणे महापालिकेकडून नुकतेच अंतिम रूप देण्यात आले. १३ किमी लांबीच्या या रस्त्यासाठी १ हजार २५१ कोटींचा खर्च येणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा रस्ता विकसीत करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. आता हा प्रकल्प अहवाल पुढील कार्यवाहीसाठी एमएमआरडीएकडे पाठवण्यात येणार आहे.

वाचा:

देशभरातून मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांना आणि मुंबईतून बाहेर पडणाऱ्या वाहनांना ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे निर्माण होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ठाणे शहराबाहेरून जाणाऱ्या पर्यायी कोस्टल रोडचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग तीनवरील खारेगाव टोलनाका ते घोडबंदर मार्गावरील गायमुख चौपाटीपर्यंत १२.९५० किमी लांबीचा चौपदरी कोस्टल रोड असेल. ४० ते ४५ मीटर रुंद असलेल्या या रस्त्यावर आपत्कालीन परिस्थितीसाठी एक विशेष मार्गिका राखीव असणार आहे. ७.२९ किमी लांबीचा रस्ता सीआरझेड क्षेत्रातून जात असल्याने या ठिकाणी उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे. तर नौदल केंद्राच्या जवळून जाताना ५०० मीटर भूमिगत मार्गिकांमधून कोस्टल रोड पुढे सरकणार आहे. दहा वर्षांपूर्वी या पुलाचा अंदाजे खर्च ३०० कोटींच्या आसपास

वाचा:

होता. सीआरझेड, नौदल कॅम्प परिसरातून हा रस्ता जात असल्याने त्याच्या प्रत्येक नियोजित मार्गामध्ये निरनिराळे बदल करण्यात आले. या बदलानुसार हा पुल खाडीतून उन्नत आणि नौदल परिसरात भूमिगत करण्यात येणार असल्यामुळे खर्चात ६५० कोटींची वाढ होऊन एकूण खर्च १ हजार २५१ कोटींपर्यंत वाढला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here