म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक व त्यांचा मुलगा यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडून () सुरू असलेल्या चौकशीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकांवर शुक्रवारी प्राथमिक सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने चौकशी थांबवण्यास नकार देतानाच पुढील सुनावणी सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे

वाचा:

परदेशी बँक खात्यांमध्ये पैसे वळवून फेमा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले, अशा आरोपाखाली भोसलेंची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात ‘ईडी’ने २०१५मध्ये त्यांना एक कोटी ८० लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी भोसले यांच्या पुण्यातील गणेशखिंड रोड येथील अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (अबिल) कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली. तपासणी पूर्ण झाल्यानंतर मध्यरात्री अमित भोसले यांना चौकशीसाठी मुंबईत आणले होते.

‘ईडी’ने समन्स बजावण्यापूर्वी व कार्यालयावर छापा टाकण्यापूर्वी आरोपांविषयी कोणतेही कारण दिले नाही. तपासात संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवूनही ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने कारवाई केली. त्यामुळे याचिकांवर सुनावणी होईपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यास मनाई करावी’, अशी विनंती भोसले पितापुत्रातर्फे ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते व अशोक मुंदरगी यांनी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाला ‘व्हीसी’ सुनावणीत केली. याचिकांमधील आरोपांना उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत द्यावी, अशी विनंती ‘ईडी’तर्फे अॅड. हितेन वेणेगावकर यांनी दिली. तोपर्यंत कठोर कारवाई होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर ‘ईडी’ची चौकशी थांबवण्यास नकार देतानाच खंडपीठाने याविषयीची सुनावणी सोमवारी ठेवली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here