लंडन: ब्रिटनमध्ये शीख समुदायाला हिंसाचाराची चिथावणी देणाऱ्या टीव्हीला दंड ठोठावण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांवर देखरेख ठेवणारी संस्था ऑफकॉमने खालसा टीव्ही लिमिडेटला ५० लाख रुपयांचा (५० हजार पौंड) दंड ठोठावला. भारतात हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या एका म्युजिक व्हिडिओचे प्रसारण करणे आणि शीख फुटीरतावाद्यांच्या हिंसक कारवाया सकारात्मक पद्धतीने दाखवल्याप्रकरणी ऑफकॉमने खालसा टीव्हीला दोषी ठरवले आहे.

ऑफकॉमने इतर मुद्यांवर या वाहिनीवर कारवाई केली. यामध्ये शीख धर्मावर टीका करणाऱ्यांविरोधात हिंसा करणे आणि एका दहशतवादी गटाला वैध ठरवण्यासाठी प्रयत्न केले. म्युझिक व्हिडिओ ‘बग्गा अॅण्ड शेरा’मधील गाणे जुलै २०१८ मध्ये खालसा टीव्हीवर प्रसारीत करण्यात आले. या गाण्यात इंदिरा गांधी यांचा फोटो दाखवण्यात आला. या फोटोत इंदिरा गांधी यांच्या तोंडातून रक्त येत असल्याचे दाखवण्यात आले होते. इंदिरा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ओळी या फोटोवर होत्या. त्याशिवाय लाल किल्ला जळताना दाखवण्यात आला होता.

वाचा:
ऑफकॉमने जारी केलेल्या वक्तव्यानुसार, व्हिडिओमधील फोटो आणि त्यातील वक्तव्ये हे भारताविरोधात हिंसाचार करण्याची चिथावणी देतात. त्याशिवाय हिंसाचार करणाऱ्यांचे कौतुक या गाण्यातून होते. खालसा टीव्हीजवळ शीख समुदायाशी निगडीच कार्यक्रम ब्रिटनमध्ये प्रसारीत करण्याचा परवाना आहे. तीन वेळेस हा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारीत केल्याबद्दल खालसा टीव्हीवर २० हजार पौंडचा दंड ठोठावण्यात आला.

वाचा:
या व्हिडिओतून शीख दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचे समर्थन करण्यात आले. यामध्ये ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये सहभागी असलेल्यांची हत्या करणाऱ्यांचा समावेश आहे. ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये सहभागी असणाऱ्यांची हत्या खलिस्तानी दहशतवाद्यांनी केली होती. या व्हिडिओत अन्य काहींच्या हत्या आणि हिंसाचारासाठी उकसवण्यात आले होते. एनआयएने खलिस्तान लिबरेशन फोर्सच्या रमनदीप सिंग बग्गा आणि हरदीप सिंग शेराविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचे ऑफकॉमने सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here