म. टा. खास प्रतिनिधी,

येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उद्घाटक म्हणून कोण येणार, याची चर्चा होत असताना संमेलनाच्या कार्यालयात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, रामचंद्र गुहा, जावेद अख्तर, गणेश देवी यांची नावांची चर्चा होत आहे. त्यात बहुतांश लोकांची यांच्या नावाला पसंती असल्याचे समजते.

साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून कोण येणार, याची सर्व नाशिककरांना उत्सुकता आहे. साहित्य महामंडळाने लोकहितवादी मंडळाला पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, संमेलनाच्या मंचावर भूमिका नसलेल्या राजकारणी नेत्यांना पाचारण करू नये. उद्घाटक व समारोपाचा प्रमुख पाहुणा हा साहित्य अथवा कलेच्या प्रांतातील असावा. त्यामुळे राजकीय व्यक्ती आल्या तरी त्यांना सन्मानाने पुढील रांगेत बसवावे, असे सूचविण्यात आले.

…या नावांवर चर्चा

संमेलनाची वेळ जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी वेगवेगळ्या नावांच्या चर्चा झडू लागल्या आहेत. संमेलन नियोजित अध्यक्ष हे ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर असल्याने सुधा मूर्ती यांना उद्घाटक म्हणून बोलवावे, असा मत प्रवाह पुढे आला. परंतु, त्यांच्यापर्यंत पोहचणे कठीण नाही. दुसरे नाव रामचंद्र गुहा यांचे होते. मात्र, त्यांचे भाषण हे इंग्रजीत होण्याची शक्यता असल्याने त्याचे नाव देखील मागे पडले. त्यानंतर ज्येष्ठ भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या नावाची चर्चा झाली. परंतु, ती देखील मागे पडली असल्याचे समजते. याच काळात गीतकार गुलजार यांचेही नाव पुढे आले होते. मात्र, प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत त्यांनी येण्यास नकार दिला आहे.

पटेलांचा नाशिकशी स्नेह

जब्बार पटेल हे महाराष्ट्राच्या भूमीतील आहे. त्यांचा साहित्याशी जवळचा संबंध आहे. नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचा चित्रपट व साहित्याशी जवळचा संबंध आहे. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. तसेच महाराष्ट्रातील तमाम लोकांना माहित असलेला चेहरा असल्याने त्यांच्या नावाची शिफारस होण्याची शक्यता आहे. साहित्य महामंडळाकडून देखील त्यांचे नाव चर्चेत आहेत. साहित्य महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचेच नाव आग्रही ठेवले आहे. त्यामुळे येत्या काळात संमेलनाच्या उद्घाटन किंवा समारोपासाठी पटेल यांना निमंत्रण दिले जाऊ शकते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here