नवी दिल्ली:
केंद्र सरकारला लोकांच्या विशेषत: मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गाच्या हाती पैसा ठेवायचा आहे. आम्हाला आयकर प्रक्रिया सोपी करायची आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

आयकर प्रणालीबाबत आणलेल्या नव्या धोरणासंबंधी त्या म्हणाल्या, ‘प्रामाणिक करदात्यांसाठी केंद्र सरकारने आणलेला नवा टॅक्सपेअर चार्टर (कररचना) हे महत्त्वाचे पाऊल आहे. यंदाच्या बजेटमधील ही सर्वात महत्त्वपूर्ण घोषणा आहे. आम्हाला कर दर कमी करायचे आहेत आणि त्याचवेळी त्यातील जटीलता कमी करायची आहे.’

‘कंपनी करात कपात केल्यामुळे उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन मिळाले. जीएसटी कर संकलनातदेखील सुधारणा झाली. परिणामी पुढील वित्तीय तूट नियंत्रणाला हातभार लागेल, त्याशिवाय निर्गुंतवणूक योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे,’ असे त्या म्हणाल्या.

‘देशांतर्गत वस्तूंची खप वाढवण्यासाठी खासगी तसेच सार्वजनिक खर्चात वाढ करायला हवी, मात्र त्याचवेळी दुसऱ्या बाजूला महसूल घटल्याने खर्च वाढवणे तू्र्त शक्य नाही. म्हणून सरकारने वित्तीय तुटीचं उद्दिष्ट अर्ध्या टक्क्याने वाढवले आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, तत्पूर्वी केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकालातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. आपल्या कारकिर्दीतील सर्वात प्रदीर्घ भाषण सीतारामन यांनी केलं. मात्र, अर्थसंकल्पाचं वाचन करत असताना मध्येच सीतारामन यांची तब्येत बिघडली. हे लक्षात आल्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांना बसण्यास सांगण्यात आले. त्यामुळे अर्थसंकल्पाचा समारोप त्यांनी केला नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here