म. टा. प्रतिनिधी, जळगाव

नवीन कृषी कायद्यांना विरोधासाठी शेतकऱ्यांनी साठ दिवसांपासून दिल्लीला वेढा दिला आहे. शेतकऱ्यांच्या भीतीने () तटबंदी उभारून आत राहत आहेत. मला नरेंद्र मोदी यांच्यामध्ये १७७१ साली मराठी फौजेपासून संरक्षण करण्यासाठी अशीच तटबंदी उभारणारा अफगाणिस्तानातून आलेल्या दिसत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री () यांनी भुसावळ येथे केली.

जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी रात्री, भुसावळ येथे तेली समाज मंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद मेळावा पार पडला. मेळाव्यात माजीमंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, गफ्फार मलिक आदी उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी पुढे सांगीतले की, नरेंद्र मोदी यांनी २ निर्णय घेतले. पहिल्या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला आहे. त्यामुळे तटबंदी उभारून मोदी आत राहत आहेत. स्टीलची रेलिंग असो, मोठमोठे खड्डे खोदून तसेच अर्धा ते एक फुटांपर्यंतचे खिळे उभारून मोदींनी तटबंदी तयार केली आहे. शेतकरी आपल्या अंगावर येतील आणि काहीतरी करतील, या भीतीने नरेंद्र मोदी तटबंदीत राहत आहेत. १७७१ साली महादजी शिंदे यांनी दिल्लीवर आक्रमण केले होते. मराठी सैन्य आपल्यावर आक्रमण करेल, या भीतीने अफगाणिस्थानातून आलेल्या नजीब खान याने देखील अशीच तटबंदी उभारली होती. मला नरेंद्र मोदींमध्ये हाच नजीब खान दिसतो, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. मोदींनी सुरुवातीलाच शेतकऱ्यांशी चर्चा केली आता अशी वेळ आलीच नसती असेही पाटील म्हणाले.

कामगार कायद्यांच्या बाबतीतही जयंत पाटील यांनी मोदींवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदींनी कामगार कायद्यात केलेले बदल अन्यायकारक आहेत. ज्या कंपनीत ३०० पेक्षा कमी कामगार असतील, त्या ठिकाणी युनियन करता येणार नाही. आजवर कामगारांच्या हिताचे, कष्टकऱ्यांना संरक्षण देणारे कायदे आपण केले. परंतु, मोदी सरकार त्या विरोधात काम करत आहे. ज्यावेळी देशातील शेतकरी, कष्टकरी व कामगारांचा असंतोष आणि विरोध वाढत जाईल, तेव्हा मोदींची लोकप्रियता अजून कमी होत जाईल. देशातील बदलत्या वातावरणात आपणही आपली भूमिका लोकांपर्यंत जाऊन मांडायला हवी, असेही जयंत पाटील म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

माझा छळ भाजपला महाग पडेल- खडसे

मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले, नाथाभाऊला कसे तुरूंगात टाकता येईल, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु, मी आयुष्यभर कधीही दोन नंबरचे धंदे केले नाहीत. जिल्ह्यात कोणाकडून नोकरीसाठी किंवा भरतीसाठी एक रुपया घेतला नाही. असे असेल तर कुणी सांगावे, तोंडात शेण घालावे. आपण असे उद्योग केले नाहीत म्हणून भाजपला शोधूनही काहीही सापडले नाही. मला अडकवण्यासाठी छळण सुरू आहे. मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल. तुमच्या बरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होईल, असा इशारा खडसे यांनी यावेळी दिला.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here