बीड जिल्ह्यातील परळी या गावची असलेली पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी तिनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. मात्र, पूजानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. मात्र, भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं नाव घेत आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वाचाः
पूजा चव्हाणची आत्महत्या ही दुर्देवी आहे. मात्र, त्या घटनेशी मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणं योग्य होणार नाही. यासर्व प्रकरणात माहिती घेतल्यानंतरच बोलणं उचित होईल, अशी सावध भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times