मुंबई: करोनाच्या संकटकाळात राज्यसरकारने शिवजंयती साजरी ()करण्याबाबत काही निर्बंध घालत साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या या भूमिकेविरुद्ध भाजपने मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. या टीकेला उत्तर देत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. प्रवक्ते (Sachin Sawant) ट्विट करत विरोधी पक्षाला टोले लगावले आहेत. ( spokesperson criticizes )

सचिन सावंत ट्विटमध्ये म्हणतात की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना विकणारे, शिवस्मारकात भ्रष्टाचार करणारे, नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांबरोबर करणाऱ्या छिंदम प्रवृत्तीच्या भाजपाने महाराजांच्या जयंतीबाबत आम्हाला शिकवण देऊ नये. त्यांनी मोदींचा वाढदिवस साजरा करावा. कोरोनाचा संकटकाळ आहे हे विसरता कामा नये.’

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटवर ट्विट करत भाजपला बोल सुनावले आहेत. ते आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हणतात, ‘शिवराय हे रयतेचे राजे होते. शिवराय आमचे आदर्श आहेत. आमच्या हृदयात आहेत. रयत संकटात असताना त्यांनी जी भूमिका घेतली असती तीच महाविकासआघाडी सरकार घेत आहे. शिवरायांचा राजधर्म हाच होता. दाढी वाढवून स्वतःची शिवरायांबरोबर तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना तो कळणार नाही.’

राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी एक नियमावली जारी केली होती. करोनाचा विचार करता या नियमावलीत काही निर्बंध घालण्यात आले होते. यावरुन भाजपने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. शिवसेनेने सत्तेसाठी अनेकवेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढे लोटांगण घातले असल्याचे भाजपने म्हटले होते. आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घालून शिवसेनेने ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’ चा नवा प्रयोग सादर केल्याचे भाजपने म्हटले होते.

क्लिक करा आणि वाचा-
‘हिंदू समाज सडा हुवा है’ असे म्हणणाऱ्या शर्जिल आणि एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला ठाकरे सरकारकडून पायघड्या अंथरल्या जात असतताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मात्र शिवजयंती साजरी करायला राज्य सरकार बंधने घालते, असे म्हणत भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. दारूची दुकाने, नाईटलाइफ, बार सुरु करण्यास परवानगी देताना सरकार गर्दीचा विचार करीत नाही. पोवाडे, बाईक रॅली, मिरवणुकांवर मात्र आघाडी सरकारने अनेक बंधने घातली आहेत, अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here