पुणे: केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते (Ramdas Athawale) यांनी आपल्या शैलीत काँग्रेस नेते (Rahul Gandhi) यांच्यावर टीका केली आहे. ‘हम दो, हमारे दो’ हा नारा राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी ‘हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने लग्न करावे, अशी टीका आठवले यांनी केली. ‘हम दो हमारे दो’चा वापर करत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत राहुल गांधी हे शेतकरी आंदोलनाला ()चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आठवले यांनी म्हटले आहे. (union minister criticizes congress leader )

रामदास आठवले हे पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी आपला माल जिथं जास्त पैसे मिळतील तिथं विकू शकतात, इतकेच सध्याच्या केंद्रीय कृषी कायद्यात आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधातील नाही. शेतकरी आहेत म्हणूनच आम्हाला खायला मिळत आहे याची आम्हाला कल्पना आहे, असे आठवले म्हणाले. हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणले गेले आहेत. मात्र, या कायद्यांबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

क्लिक करा आणि वाचा-

मूळ शेतकरी आंदोलनात नाही- आठवले

देशात केंद्र सरकारचे कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले जात असल्याचे आठवले म्हणाले. देशातील शेतकरी कायद्याच्या विरोधात नाहीत. पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकरी या कायद्यांना विरोध करत आहेत, असे म्हणत देशातील मूळ शेतकरी आंदोलनात आलेला नसल्याचे आठवले म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here