तिघांनी मोबाईलमध्ये ‘फ्री फायर’गेम डाउनलोड केला. तिघेही सोबतच गेम खेळायला लागले. शनिवारी पहाटे तिघांनी घरून पलायन केले. सकाळी ७ वाजताच्या सुमारास तिघेही बेपत्ता झाल्याचे नातेवाइकांना लक्षात आले. नातेवाइकांनी शोध घेतला. तिघेही आढळून आले नाहीत. नातेवाइकांनी प्रतापनगर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुलांचा तात्काळ शोध घेण्याचे निर्देश प्रतापनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर ठोसरे यांना दिले.
क्लिक करा आणि वाचा-
हसन यांच्या मार्गदर्शनाखाली ठोसरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यांचे मोबाइल ‘लोकेशन’ तपासले. तिघेही सकाळी ओला कॅबने रेल्वेस्थानकावर उतरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. मुंबईकडे जाणाऱ्या गाडीत ते बसल्याचेही आढळून आले. पोलिसांनी लगेच भुसावळ व मुंबई लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. मुंबई लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा दलाला तिन्ही मुलांचे छायाचित्र पाठविण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times