राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’निमित्त गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज शनिवारी यात्रेच्या समोरोपाच्यावेळी जळगाव शहर व ग्रामीण विभागाचा मेळावा जळगावातील लेवा भवनात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या व्यासपीठावर मंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी मंत्री , अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतिष पाटील, मनिष जैन, संतोष चौधरी, दिलीप वाघ, आमदार अनिल पाटील,रोहीणी खडसे, ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
वाचाः
ग्रामीण मतदारसंघातील गटबाजी उघड
या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव शहर व ग्रामीण मतदारसंघातील पक्ष संघटनाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून कार्यकारणीची माहीती जाणून घेतली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी जळगाव ग्रामीण विभागात सुरुवातील राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र, नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने ताकद कमी झाल्याची माहीती दिली. तसेच गुलाबराव देवकरांकडे उंगलीनिर्देश करीत व्यासपीठावरील फलकावर देखील आमचे फोटो लावले नसल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. तसेच नेत्यांना मतभेद मिटविण्या सांगा अशी सूचनाही त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली. यानतंर गुलाबराव देवकर यांनी अश्या छोट्या छोट्या विषयांवरुन नाराजी करु नका असे ज्ञानेश्वर महाजन यांना सांगतांनाच धरणगाव तालुक्यात माझ्या खर्चाने लावलेल्या फलकांवर तुमचा फोटो लावल्याची अठवण त्यांना करुन दिली. एकूणच संघटना मजबूत करण्यासाठी घेतलेल्या मेळाव्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटबाजीचे दर्शन झाल्याने नेतेही नाराज झालेत.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times