पुरावा असल्याशिवाय कुणाची विनाकारण बदनामी करणे चुकीचे होईल. पुरावा असेल तर निश्चितच कारवाई होईल. ती कारवाई थांबवता येत नाही. त्यात यांची बाजू घेण्याचा विषयच नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त मंत्री जयंत पाटील हे जळगावात आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहे. याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी मात्र, सावध प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांकडे ठाम पुरावा असेल तर निश्चित कारवाई होईल. पण विनाकारण कोणाला बदनाम करणे योग्य नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमध्ये सध्या शीतयुद्ध रंगले आहे. या विषयावर बोलताना जयंत पाटलांनी राज्यपालांना चिमटा काढला. ते म्हणाले, राज्यपालांच्या भूमिकेबाबत महाराष्ट्राची एक उच्च परंपरा आहे. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासह अनेक राज्यपालांनी ही परंपरा निर्माण केली होती. राज्यपाल निवडताना ही परंपरा पाळली गेली आहे. आताचे राज्यपाल देखील ही परंपरा टिकवण्याचे काम करतील, अशी मला खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. विजय वडेट्टीवार नेमक्या कोणत्या प्रकरणासंदर्भात बोलले आहेत, याची मला माहिती नाही. त्यामुळे त्यावर बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times