म.टा. प्रतिनिधी, नगर: शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरील आयएएस अधिकारी नियुक्तीप्रकरणी राज्य सरकारने शपथपत्र सादर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. एका जनहित यायिकेच्या सुनावणी दरम्यान हा आदेश देण्यात आला असून पुढील सुनावणी २६ फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे.

संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. हे मंडळ नियुक्त होऊपर्यंत कोर्टाने तदर्थ समितीमार्फत कामकाज पाहण्याचा आदेश दिला आहे. या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र, शेळके यांनी या पदावरील नियुक्तीलाही हरकत घेतली आहे.

वाचाः

याचिक त्यांनी म्हटले आहे की, सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे त्यांची या पदावर नियुक्ती झाली तेव्हा आयएएस नव्हते. नियुक्तीनंतर त्यांना पदोन्नती मिळालेली आहे. सर्वोच्य न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशप्रमाणे थेट आयएस झालेल्या अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करणे आवश्यक आहे. मात्र, बगाटे यांची ज्या दिवशी नियुक्ती झाली, त्या दिवशी ते आयएएस नव्हते. हा सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होतो. त्यामळे सरळ नेमकीच्या आयएएस अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करावी, अशी मागणी शेळके यांनी केली आहे.

वाचाः

या प्रकरणी न्यायालयाने सरकारला शपथपत्रावर म्हणने सादर करण्याचा आदेश दिला आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. सतीश तळेकर, प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे काम पाहत आहेत. तर सरकारतर्फे वतीने ऍड. डी. आर. काळे काम पाहत आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here