सौरभ सुभाष वर्मा आपल्या दोन भाऊ आणि आई-वडिलांसह जळगावातील बालाजीपेठ परिसरात राहत होता. सौरभला दारूचे व्यसन होते. दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. नेहमीप्रमाणे काल शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्री साडेअकरा वाजता सौरभ दारू पिऊन घरी आला. त्यामुळे सौरभ आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद सुरू झाले. वाद इतके विकोपाला जावून त्याचे रूपांतर झटापटीत झाले. यात सौरभ हातातील चाकू काढून वडिलांना धमकावत होता.
वाचाः
संतप्त झालेल्या वडिलांनी सौरभच्या हातातील चाकू हिसकावून त्याला दम दिला. सौरभ वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला असता वडिलांच्या हातातील चाकू सरळ सौरभच्या पोटात खुपसला गेला. त्यात सौरभ गंभीर जखमी झाला. तातडीने त्याल जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर संशयित आरोपी सुभाष बन्सीलाल वर्मा हे स्वत:हून शनिपेठ पोलीस ठाण्यात हजर झाले. या प्रकरणी संशियत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times