सदाभाऊ खोत एका कार्यक्रमासाठी सांगलीत आले होते. त्यावेळी सदाभाऊ यांनी या कार्यक्रमात अजब वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसंच, त्यांचं हे वक्तव्य नेमकं कोणासाठी उद्देशून होतं याबाबतही तर्क वितर्क लढवले जात आहेत.
आमदार आणि खासदार व्हायला अक्कल लागत नाही. मी राज्य मंत्री झाल्यावर मला कळले की निवांत झोपा काढल्या तरी चालतय, कामं आपोआप होतात, असं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
वाचाः
राजकारणात लोकं जितकं मिळतं तितकं घेतात. अडीच वर्षाच्या पदाचं काही खरं नसतं. अनेक लोकांना शब्द दिला जातो, तुला आमदार करतो. राजकारणात तुम्ही झोपून राहिलात तर लोक गळा दाबून जातात, असं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडं आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. तसंच, सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्याने राजकारणात नवं वादळ उठणार का? हे पाहणं ही महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचाः
दरम्यान, अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी यांना इतकेच प्रेम आहे तर आजपर्यंत त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आरक्षण का मिळवून दिले नाही, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times