राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांच्या जवळ आहे. त्यामुळं करोनाच्या विळख्यात सापडलेल्या राज्यासाठी हा मोठा दिलासा आहे. राज्यात गेल्या ९ महिन्यांपासून करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहेत. आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. असं असलं तरी आजही करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळं रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे आव्हान अजूनही कायम आहे.
वाचाः
आज राज्यात १ हजार ७७३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ७४ हजार २४८ इतकी आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८३% एवढे झाले आहे. सध्या राज्यात १,७५,४१८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
वाचाः
आज राज्यात ३८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५ टक्के इतका आहे. दिलासादायब बाब म्हणजे, राज्यात एकूण ३३ हजार २६९ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५२,७२,८२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,६०,१८६ (१३.४९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात २७९ नवे रुग्ण
ठाणे: जिल्ह्यात शनिवारी नवीन २७९ करोना रुग्णांची वाढ झाल्याने बाधितांची संख्या २ लाख ५७ हजार ३९१ वर गेली आहे. तर २७३ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढत २ लाख ४७ हजार ९१३ इतकी झाली आहे. सध्या ३२७८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर दिवसभरात दोन रुग्ण दगावले. दरम्यान, ठाणे शहरातील रुग्ण संख्येने ६० हजाराचा टप्पा ओलांडला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times