‘दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने केलेले नवे () मागे घेतले तर अन्य कायदेही मागे घेण्याची मागणी होऊ शकते. त्यामुळे लोकशाही आणि संविधानही (COnstitution) धोक्यात येईल,’ अशी भीती केंद्रीय राज्यमंत्री () यांनी व्यक्त केली आहे. ‘आम्हीही अनेक आंदोलने केली, मात्र या आंदोलनाप्रमाणे लोकांना वेदना होतील, असे कधी वागलो नाही,’ असेही आठवले म्हणाले. (if the agricultural laws are withdrawn, the will be threatened)
आठवले अहमदनगरला आले आहेत. त्यावेळी पत्रकारांशी विविध विषयांवर त्यांनी संवाद साधला. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंधी आठवले म्हणाले, ‘उद्योजक अदानी आणि अंबानी यांचा कृषी कायद्यांशी संबंध जोडणे चुकीचे आहे. त्यांच्या फायद्यासाठी मोदी सरकारने हे कायदे केले, हा दावाच चुकीचा आहे. अदानी आणि अंबानी यांचे व्यवसाय वेगळे आहेत. ते कृषीमालावर अवलंबून नाहीत. शिवाय या कायद्यामुळे ते कृषी मालाच्या खरेदीला येतील, असे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसऱ्यांदा सत्तेत आले आहेत, त्यामुळे ते अशा कोणाच्या फायद्यासाठी कायदे करतील असे होणार नाही.
शेतकऱ्यांची मागणी कायदेच मागे घ्यावेत, अशी आहे. ती पूर्णपणे चुकीची आहे. कारण आज हे कायदे मागे घेतले तर उदया दुसरे घटक इतर कायदे मागे घेण्याची मागणी करतील. तसे झाले तर आपली लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले अडचणीत येईल. या कायद्यांना काळे कायदे का म्हणतात, यात काळे काय आहे, ते दाखवून द्यावे,’ असेही आठवले म्हणाले.
प्रजासत्ताकदिनी घडलेल्या हिंसाचाराबद्दल आठवले म्हणाले, ‘२६ जानेवारीला शेतकरी आंदोलकांना दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी द्यायला नको होती. दिल्ली पोलिसांनी ती दिली. त्यामुळेच त्याचे स्वरुप बिघडून हिंसाचार झाला. मात्र, यासाठी भाजपला जबाबदार धरणे चुकीचे आहे. भाजप आणि मोदी यांनी सतत तिरंग्याचा सन्मानच केला आहे. आंदोलन मिटविण्यासाठी सरकारने बारा बैठका घेतल्या. मात्र, तोडगा काढायचा नाही, अशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे.
क्लिक करा आणि वाचा-
सर्वोच्च न्यायालाचा आदेश आल्यावर तरी ऐकायला हवे होते. मात्र, आंदोलन वाढवतच नेले जात आहे. नामांतरासारख्या संवेदनशील विषयावर आम्हीही आंदोलने केली. मात्र, लोकांना वेदना होतील असे कधीही वागलो नाही. हे शेतकऱ्यांचे आंदोलन मात्र चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. या आंदोलनासंबंधी केंद्र सरकारची भूमिका साफ आहे, सर्वोच्च न्यायालाचा जो काही निकाल आहे, त्याचे पालन करण्यास सरकार तयार आहे,’ असेही आठवले म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times