अभिषेक पंत यांना क्रिकटचं खूप वेड होतं. दुर्घटना झाली त्या दिवशी त्यांना क्रिकेटचा सामना खेळायला जायचं होतं. ते क्रिकेट मॅच खेळण्यासाठी ढाक गावात जाणार होते. पण त्यांना प्रकल्पावरून फोन आला. वीज पुरवठ्यात काहीतरी समस्या आहे, यामुळे प्रकल्पावर या असा त्यांना फोन आला. क्रिकेट सामना खेळायच्या जाण्याच्या १ मिनिट हा फोन त्यांन आल. यामुळे अभिषेक हे क्रिकेट मॅच खेळायचं सोडून प्रकल्पावर गेले. तर त्यांचे मित्र क्रिकेट खेळायला निघून गेले. अभिषेक हे प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचताच. नदीला पूर आला. तेव्हा ते ही बेपत्ता आहेत.
अभिषेक बेपत्ता झाल्याने आमच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. पुराची घटना घडल्यानंतर आम्हाला आम्ही घटनास्थळावरच आहोत. बचावकार्यात असलेल्या यंत्रणाने आपला वेग वाढवण्याची गरज आहे, असं त्यांच्या लहान भावाने सांगितलं.
अभिषेकचं येत्या एप्रिलमध्ये लग्न होणार होतं. त्याच्या लग्नाची तयारी घरात सुरू होती. पण या दुर्घटनेने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही भीती आहे. आता त्याच्या परतण्याची आपेक्षा आहे, असं अभिषेक यांचा लहान भाऊ संजयने सांगितलं.
४० मृतदेह हाती, १६४ बेपत्ता
उत्तरखंडमधील पूर दुर्घटनेत आतापर्यंत ४० मृतदेह हाती आले आहेत. तर अजूनही १६४ जण बेपत्ता आहेत, अशी माहिती उत्तराखंड सरकारने दिली आहे. दरम्यान, तपोवनमधील बोगद्यात सुरू असलेल्या बचावकार्यात चिखलातून दोन मृतहाती आले आहेत. दोन मृतदेह आढळून आल्यानंतर बोगद्यातील शोध आणि बचावकार्याचा वेग वाढवण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times