: प्रेम, मैत्री व्यक्त करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पिवळ्या, केशरी, तसेच लाल रंगाच्या गुलाबांना निमित्ताने चांगलाच भाव आला. करोनामुळे घटलेली आवक, तसेच मागणीवर परिणाम झाला असला, तरी शनिवारी गुलाबाच्या २० फुलांच्या गड्डीचा दर घाऊक बाजारात १५० ते ३०० रुपयांपर्यंत पोहोचला.

व्हॅलेंटाइन डे आज, रविवारी जगभर साजरा होत आहे. त्यानिमित्ताने गुलाबाच्या फुलांना अधिक मागणी होत असते. यंदाच्या व्हॅलेंटाइन डे निमित्ताने गुलाबाची विविध रंगाची फुले बाजारात आली असली, तरी त्याला करोनाच्या संकटाचा परिणाम त्यांच्या उत्पादनासह मागणीवर झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

‘पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात शुक्रवारपासून वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आवक साधारण आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर उत्पादनही थोडेसे घटले असून, मागणीवर परिणाम झाला आहे. तळेगाव, शिरूर, जातेगाव येथून आवक झाली असून, परराज्यातून यंदा आवक झालेली नाही. पुण्यात आलेली फुले व्हॅलेंटाइन डेसाठी कोकण, मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश येथे पाठविण्यात आली आहेत. डच गुलाबाच्या २० फुलांच्या गड्डीला गेल्या वर्षी २५० रुपयांपर्यंत दर होते. मात्र, शुक्रवारपासून १५० ते ३०० रुपयांपर्यंत दर मिळू लागले आहेत,’ अशी माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली. ‘यंदा फुलांची लागवड शेतकऱ्यांनी कमी केली आहे. फुलांची ऑनलाइन मागणी करणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली असून, २० ते ३० टक्के मागणी घटल्याचे निरीक्षण आहे,’ असेही भोसले यांनी सांगितले.

बाजार समितीच्या फूल विभागाचे प्रमुख महादेव शेवाळे म्हणाले, ‘यंदाच्या वर्षी गुलाबाच्या फुलांची आवक कमी झाली आहे. साध्या एका गुलाबाला सुमारे ५० रुपयांपर्यंत दर मिळाला. डच गुलाबाच्या २० फुलांच्या गड्डीला २५० रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. दिवसभराच ११०० गड्ड्यांची फुलांची आवक झाली.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here