म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेचे नेते व खासदार यांनी शनिवारी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांची भुजबळ फार्म हाऊस येथे भेट घेऊन भुजबळ यांच्याशी गुफ्तगू केले. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन नेत्यांमध्ये फार्महाऊसवर झालेली ही भेट चर्चेचा विषय बनली आहे. आगामी निवडणुकीत आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्य पंचवार्षिक निवडणूक आहे. सध्या महापालिकेत भाजपची सत्ता आहे. शिवसेना भाजपकडे असलेली महापालिकेची सत्ता भाजपकडून हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी शिवसेनेने आक्रमकता स्वीकारली आहे. शिवसेनेने निवडणुकीच्या वर्षभर आधीच संघटनात्मक फेरबदल करत महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी महापालिकेची निवडणूक या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढाव्यात असा शिवसेनेचा जोर आहे.

खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीत राज्याचा पॅटर्न वापरावा अशी विनंती काँग्रेस, राष्ट्रवादीला केली आहे. परंतु, काँग्रेसने महापालिकेसाठी ताकद नसतांना ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वबळावर निवडणूक मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असला तरी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्यास पसंदी दिल्याची चर्चा आहे. भाजपने महापालिका आपल्या ताब्यात राहण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीने महापालिकेत आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे संपर्कमंत्री भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार समीर भुजबळ हे देखील उपस्थित होते. महापालिका निवडणुकीसाठी काय रणनीती ठेवायची यावर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

काँग्रेसचे ‘एकला चलो रे’!

आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला असला तरी महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रि निवडणूक लढतील अशी चर्चा आहे. गेल्या महापालिका निवडणुकीवेळी काँग्रेस, राष्ट्रवादीत जागावाटपावरून बिनसले होते. त्यामुळे काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. शहरात भाजपचे तीन आमदार तर ६४ नगरसेवक आहेत. भाजपची ताकद मोठी असल्याने निवडणुका जिंकण्यासाठी महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही, असा मतप्रवाह शिवसेना आणि राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here