म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचारलं तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही, या माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगई (Ranjan Gogoi) यांच्या विधानावर ज्येष्ठ नेते () यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना काळजी व्यक्त केली.

‘गोगई यांचे विधान धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे आहे,’ अशी टिप्पणी पवार यांनी केली.

पवार म्हणाले, ‘गेल्या आठवड्यात माझ्या वाचनात आले होते की देशातील न्यायव्यवस्था उच्च आहे. न्यायाधीश यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी हा उल्लेख केला होता. त्याबाबत आनंद झाला; पण गोगई यांचे विधान धक्कादायक आहे. त्यांनी न्याय व्यवस्थेबाबत त्यांच्या परीने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला का हे मला ठावूक नाही. त्यांचे विधान प्रत्येकाला चिंता करायला लावणार आहे.’

क्लिक करा आणि वाचा- पूजा चव्हाण प्रकरणावर प्रतिक्रिया टाळली

पूजा चव्हाण आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आणि धनंजय मुंडे प्रकरणी शरद पवार गप्प का आहेत, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे जावे लागते. त्यांच्या बद्दल मी काय बोलणार ?

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा –

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here