नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ ला भीषण दहशतवादी हल्ला ( ) झाला होता. या थरारक घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या वीर शहीद जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( ), संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ( ) यांच्यासह भारतीय लष्कर आणि सीआरपीएफकडून आदरांजली वाहण्यात आली.

कुठलाही भारतीय आजचा दिवस विसरणार नाही. दोन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यातील शहीद जवानांना आमची आदरांजली. देशाच्या सुरक्षा दलांवर आम्हाला गर्व आहे. त्यांचे शौर्य आणि पराक्रम पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

शहीद सीआरपीच्या जवानांचे असाधारण साहस आणि त्यांचे सर्वोच्च बलिदान हा देश कधीच विसरणार नाही, असं ट्वीट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहिली.

सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांना देश कायम स्मरणात ठेवेल, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

सीआरपीएफने पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहिली. सीआरपीएफने गेल्या दोन वर्षांत अनेक सुधारणा केल्या आहेत. आमच्याकडेली उपलब्ध साधन सामग्रीत अनेक सुधारणा झाल्या आहेत. दहशतवाद्यांना सणसणीत प्रत्युत्तर देऊ शकतो इतकी जय्यत तयारी आम्ही केली आहे, असं सीआरपीएफच्या काश्मीरमधील महानिरीक्षकांनी सांगितलं.

भारतीय लष्कराने व्हिडिओतून शहीदांना भावपूर्ण आदरांजली

भारतीय लष्कराने एक व्हिडिओ जारी करत पुलवामा हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. भारतीय लष्काराचा हा व्हिडिओ अतिशय भावुक करणारा आणि जगाला शांततेचा संदेश देणार आहे. हा व्हिडिओ प्रत्येकजण भावुक होईल, असा हृदयला भिडणारा संदेश लष्कराने दिला आहे.

शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, अशी भावना शहीद जवानाच्या पत्नीने व्यक्त केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here