विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांना पत्रकारांनी नागपूर विमानतळावर गाठल्यानंतर त्यांनी हे आरोप केले आहेत. ज्या प्रकारे सर्व क्लिप्स बाहेर आल्या आहेत. यामुळे या प्रकरणी कारवाई होणे आवश्यक असल्याचे दिसते. मात्र या प्रकरणात कोणत्या ना कोणत्या दबावात काम करत असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे या प्रकरणी कोणतीही कारवाई केली जात नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ऑडिओ क्लिपची सत्यता तत्काळ तपासली जावी- फडणवीस
ज्या काही ऑडिओ क्लिप्स बाहेर आलेल्या आहेत, त्यांची सत्यता तत्काळ तपासली जावी अशी आमची मागणी असल्याचे फडणवीस म्हणाले. या क्लिपमधील आवाजा नेमका कोणाचा आहे हे स्पष्ट करावे. हा आवाज कोणाचा आहे संपूर्ण जगाला माहीत आहे. मात्र पोलिसांनी ते समोर आणायला हवे. जेथे स्पष्टपणे गुन्हा झाल्याचे स्पष्ट होत असते अशा प्रकरणात पोलिस सूमोटो कारवाई करत गुन्हा दाखल करू शकतात. मात्र पोलिस जाणूनबुजून ही कारवाई करत नाहीत आणि हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले दिसत नाही-फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण किती गांभिर्याने घेतलंय की नाही हे कळत नाही. मुख्यमंत्र्यांचे मी वक्तव्य ऐकले असून त्यांनी त्या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेतलेले दिसत नाही, किंवा त्यांनी त्या क्लिप्स ऐकलेल्या दिसत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घ्यावी म्हणजे कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले हे त्यांना कळेल, असा टोलाही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times