भूषण पवार असे आत्महत्या केलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सकाळी ते पोलीस ठाण्यात आले. सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक पवार हे एपीएमसी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सकाळी ते पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर ते केबिनमध्ये बसले होते. काही वेळाने गोळीबाराचा आवाज झाला. आवाज ऐकून पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी केबिनकडे धाव घेतली. त्यावेळी घडलेला सर्व प्रकार उघड झाला. पवार यांनी स्वतःवर रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या होत्या. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, पवार यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते. अनेकांनी त्यांना याबाबत विचारणाही केली होती. पण त्यांनी कुणालाही काहीही सांगितले नाही. पोलिसांनी आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पवार हे याआधी हडपसर आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान, डिसेंबर २०२०मध्ये अशाच प्रकारची एक घटना तुळींज पोलीस ठाण्यात घडली होती. तेथील कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times