म.टा. प्रतिनिधी, नगर

जगभर साजरा केला जात असताना अहमदनगरमध्ये मात्र तो तो वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. देशावर प्रेम व्यक्त करून जातीयवाद नष्ट करण्याचा सामाजिक संदेश देणारा उपक्रम यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. देशासाठी हसत हसत फासावर गेलेल्या भगतसिंहाच्या पुतळ्याच्या साक्षीने हा कार्यक्रम झाला. सर्व जातीधर्माच्या प्रतिनिधींना यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. (valentine’s day was celebrated in ahmednagar expressing love for the country)

नगरच्या जागरूक नागरिक मंचातर्फे शहीद भगतसिंग उद्यानात हा अगळा वेगळा व्हॅलेंटाईन डे पार पडला. संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. सुरवातीला शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा.सुनील पंडित, हरजितसिंग वधवा, अर्षद शेख व डेव्हिड चांदेकर यांना विविध धर्मांचे प्रतिनिधी म्हणून एकाच मंचावर बोलावून त्यांच्या हाती तिरंगा देऊन गुलाबपुष्प देवून सन्मानित करण्यात आले. भारत माता की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

मुळे म्हणाले, व्हॅलेंटाईन डे च्या दिवसी प्रेम व्यक्त करायचेच असेल तर आपल्या देशावर प्रेम वक्त करा. सध्या जातीयवादाच्या किडीने संपूर्ण भारतास पोखरले आहे. राजकीय पक्ष व त्यांचे पुढारी या किडीला मुद्दाम खतपाणी घालत जातीयवादचा रोग पसरवत आहेत. जाती धर्मात फुट पडून राज्य करत आहे. याला आपण छेद दिला पाहिजे. शहीद भगतसिंग सारख्या अनेकांनी देशावर प्रेम व्यक्त करत आपल्याला स्वतंत्र्य मिळवून दिले. त्यांचा आदर्श घेत देशावर प्रेम व्यक्त करून एकत्रितपणे या जातीयवादाला समूळ नष्ट करू.

क्लिक करा आणि वाचा-

जागरूक नागरिक मंचचे सुरेखा सांगळे, शारदा होशिंग, मेहरुदा शेख, प्रा.मंगेश जोशी, अभय गुंदेचा, कैलास दळवी, भैरवनाथ खंडागळे, बाळासाहेब भुजबळ, बी.यू.कुलकर्णी, योगेश गणगले, सुनील कुलकर्णी, जय मुनोत, अमेय मुळे, प्रसाद कुकडे, राजेश सटाणकर, प्रकाश भंडारे आदी उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here