हिंजवडी: पुण्यातील भूमकर चौकात एका कॅबचालकाला लुटल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅबचालक पुण्यातून प्रवाशांना घेऊन मुंबईकडे निघाला होता. शनिवारी मध्यरात्री भूमकर चौकात दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी कॅब अडवली. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल फोन घेतला आणि ते पसार झाले.

बाळासाहेब बंडगर या काळेवाडीतील कॅबचालकाने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून चौघांना अटक केली आहे. सलमान शेख, शुभम जाधव, प्रेम पोतदार आणि ललित करोटिया अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या आणखी एका साथीदाराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगर याला शुक्रवारी रात्री उशिरा प्रवासी भाडे आले. तो पुण्याहून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला होता. मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास भूमकर चौकात कार आली असता, आरोपींनी दुचाकी आडवी घातली आणि चाकूचा धाक दाखवला. बंडगर याच्याकडील रोकड आणि मोबाइल असा साडेपंधरा हजारांचा ऐवज पळवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here