मुंबई– मधू मंटेना दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे, या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तब्बल ३०० कोटी रुपये खर्च येणार असून बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. परंतु, दीपिकासोबत हृतिक हा रामायणातील नायक असलेल्या प्रभू राम नाही तर खलनायक रावणाची भूमिका साकारणार असल्याची माहिती निर्मात्यांकडून देण्यात आली आहे.

आता दिग्दर्शक मधू यांना त्यांचा चित्रपटातील राम मिळाला असल्याचं बोललं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मधू यांनी चित्रपटातील रामाच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य अभिनेता याला विचारणा केली आहे. या भूमिकेमध्ये सात्विकता आणि साधेपणा असणं अत्यंत महत्वाचं होतं. त्यासाठी दिग्दर्शकाने महेशची निवड केली आहे. या भूमिकेसाठी याआधी सुपरस्टार प्रभास याला विचारणा कारण्यात आली होती.

विशेष म्हणजे, ‘आदिपुरुष’ च्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने प्रभास या चित्रपटाला वेळ देऊ शकत नव्हता. प्रभास ‘आदिपुरुष’ मध्ये रामाचीच भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’ ची घोषणा केली तेव्हा मधू यांना धक्का बसला होता. मधू यांच्यानुसार प्रभू रामांच्या भूमिकेतील सच्चेपणा कलाकाराच्या चेहऱ्यावर दिसून येणं अत्यंत गरजेचं आहे.

महेश हा या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल. महेशला चित्रपटाची कथा आवडली असली तरी त्याने या भूमिकेसाठी अजून होकार दिलेला नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने तीन दिग्गज कलाकारांना एकाचं ठिकाणी आणण्याचं अवघड काम मधू करणार आहेत. जर, महेश यांनी या भूमिकेसाठी होकार दिला तर प्रेक्षकांना ही पर्वणीचं ठरणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here