रेल्वे स्थानक परिसरातील मनोहर नगरमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. चार जणांनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला बांधून ठेवले. त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असा साडेचार लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल लुटून पोबारा केला. या प्रकरणी अर्जुन शेटे (वय ७४) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तळेगाव-दाभाडे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेटे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. शनिवारी पहाटे त्यांच्या घराच्या खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. ते चार जण होते. त्यांच्या हातात शस्त्रे होती. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवला. दोघांचे हायपाय बांधले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर घरातील ४ लाख ६९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि घड्याळ पळवला. या घटनेची नोंद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times