मुंबई: अॅपमुळे लोकप्रिय झालेल्या बीडमधील या तरुणीच्या आत्महत्येचं प्रकरण गंभीर वळण घेत आहे. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री हे संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर भाजपकडून चौफेर हल्ले सुरू आहेत. त्यातच याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांना पोलिसांनी दोन तासांत सोडल्याचा मुद्दा पुढे करत प्रदेशाध्यक्ष यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ( )

वाचा:

पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती. मात्र, केवळ दोन तासांत या दोघांना सोडून देण्यात आले, असे नमूद करताना ही काय मोगलाई आहे का?, असा सवाल पाटील यांनी विचारला. ज्या दोघांना पकडण्यात आलं होतं त्यापैकी एकाचा आवाज ऑडिओ क्लिपमध्ये क्लिअर ऐकू येत असल्याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. मोबाइलमधील ते संवाद कुणाचे आहेत?, या प्रकरणात ज्यांची नावे पुढे येत आहेत, त्या व्यक्ती कुठे आहेत?, पूजाचा मोबाइल आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला का?, पोस्टमार्टेम रिपोर्ट दोन कसे आले?, असे अनेक प्रश्न विचारतानाच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला. पूजा चव्हाणची बदनामी करण्यात येत आहे. ती दारू पित होती. तिचे इतरांशी संबंध होते, असे सांगितले जात आहे. हे चुकीचे असल्याचेही पाटील म्हणाले.

वाचा:

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेत संजय राठोड यांचा नामोल्लेख टाळला. त्यावरून पत्रकारांनी विचारणा केली असता मी कुणाचे नाव घ्यायला घाबरत नाही. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे, असे पाटील म्हणाले. या प्रकरणात ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत त्यांचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी संबंधित मंत्र्याचं नाव अद्याप रेकॉर्डवर घेतलेलं नाही. ते नाव ज्यादिवशी रेकॉर्डवर येईल त्याचवेळी आम्ही संबधित मंत्र्याचं नाव घेऊ आणि राजीनामा मागू, असे पाटील म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here