गुवाहाटी: कॉंग्रेस नेते ( ) यांनी आज आसाम विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला औपचारिक सुरवात केली. शिवसगर जिल्ह्यात घेतलेल्या सभेत राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. आसाममध्ये फूट पाडणं आणि समाजातील एकोपा बिघडवण्याचं काम केंद्रातील मोदी सरकारने केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. अवैध निर्वासितांचा मुद्दा आहे. हा मुद्दा सोडवण्याची क्षमता राज्यातील जनतेत आहे, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी गळ्यात NO CAA असं लिहिलेला गमछा गळ्यात घातलेला दिसला.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) आमचा विरोध आहे. काहीही झालं तरी हा कायदा लागू होणार होऊ देणार नाही. हम दो हमारे दो, नीट ऐका… सीएए कधीच लागू होणार नाही, असं आव्हान राहुल गांधींनी दिलं.

भाजप आणि आरएसएसने आसाममध्ये फूट पाडण्याचं करत आहे. आमचा पक्ष आसाम कराराच्या प्रत्येक तत्त्वाचे रक्षण करेल आणि राज्यात सत्तेत आल्यास कधीच लागू करणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्याची गरज आहे. नागपूर आणि दिल्लीचा आवाज ऐकणाऱ्याची नाही, अशी टीकाही राहुल गांधींनी केली. आसाममध्ये मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

आसाम कराराच्या मुद्द्यावरून भाजप आणि आरएसएसवर राज्याचे विभाजन केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. आसाममध्ये फूट पडली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काहीच फरक पडणार होणार नाही. पण आसाम आणि उर्वरित भारतातील नागरिकांचे यामुळे नुकसान होईल. यामुळे राज्यात पक्षाची सत्ता आल्यास सीसीए लागू करणार नाही, असं आश्वासन राहुल गांधी यांनी सभेत दिलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here