वाचा:
राज्यात युद्धपातळीवर राबवली जात आहे. सध्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. असे असतानाच करोनाचा आलेख पुन्हा वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे. काल आणि आजचे करोनाचे आकडे पाहिल्यास नवीन रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र घटले आहे.
वाचा:
राज्यात आज ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या साथीने ५१ हजार ५२९ जणांचा बळी घेतला आहे. सध्या राज्यातील सध्या २.५ टक्के एवढा आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार ९२ नवीन रुग्णांची नोंद झाली तर त्याचवेळी १ हजार ३५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १९ लाख ७५ हजार ६०३ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५३ लाख २१ हजार ६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ६४ हजार २७८ (१३.४७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार २४३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १ हजार ७४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
राज्यातील अॅक्टिव्ह अर्थात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३० हजारपर्यंत खाली आली होती. मात्र, गेले काही दिवस नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ३५ हजारपार गेला आहे. राज्यात सध्या ३५ हजार ९६५ रुग्ण करोनावरील उपचार घेत आहेत. , , ठाणे या शहरांतील करोनाचे आकडे नियंत्रणात असताना अमरावती विभागासह ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर आरोग्य यंत्रणांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times