सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांना या भूमिकेसाठी इम्रान अत्यंत योग्य अभिनेता असल्याचा विश्वास आहे. तो उत्तम अभिनेता आहे आणि या भूमिकेसाठी त्याच्या सारखाचं एखादा अभिनेता अपेक्षित होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात मार्च २०२१ च्या तिसऱ्या आठवड्यापासून होणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात अभिनेता शाहरुख खान याच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर होणार आहे.
‘पठाण’ चित्रपटाचं चित्रीकरण अंतिम टप्प्यात आहे. सलमानचं या चित्रीपटाचं चित्रीकरण संपल्यावर तो टायगरच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. मार्चमध्ये इम्रानही चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात अभिनेता सज्जाद डेलैफ्रोजने खलनायकाची भूमिका उत्तमरीत्या साकारली होती. त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर इम्रानचा अभिनय प्रेक्षकांना कितपत पसंत पडतो ही गोष्ट पाहण्यासारखी आहे. सलमान आणि कतरिना यांनी याआधी ‘युवराज’, ‘पार्टनर’, ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंद है’ यासारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times