भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने यावेळी आपल्या एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, ” चेन्नईतील दुसऱ्या डावात आता कोणताही फलंदाज शतक झळकावू शकत नाही, तो रोहित शर्मा असला तरी नाही. रोहित शर्मा यावेळी अर्धशतक झळकावू शकतो. त्याचबरोबर तो ७०पेक्षा जास्त धावा करु शकतो, पण तो शतक मात्र झळकावू शकत नाही.”
भारतीय संघ किती धावांची आघाडी घेऊ शकतो, पाहा…आकाशने तिसऱ्या दिवशी भारतीय संघ किती धावांची आघाडी घेऊ शकतो, याबाबतही आपले मत व्यक्त केले आहे. आकाश म्हणाला की, ” भारतीय संघ दुसऱ्या डावात ४५० धावांची आघाडी घेऊ शकतो. भारताने जर ४५० धावांची आघाडी घेतली तर त्यांचा विजय जवळपास निश्चित होऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघाने जर एवढी मोठी आघाडी घेतली तर ते सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी करु शकतात.”
तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ किती विकेट्स गमावू शकतो, पाहा…तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ किती विकेट्स गमावू शकतो, याबाबतही भाष्य केले आहे. याबाबत आकाश म्हणाला की, ” तिसऱ्या दिवशी जर इंग्लंडच्या संघाची फलंदाजी आली तर ते किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स गमावू शकतात. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी जो रुट आणि बेन स्टोक्स या अनुभवी खेळाडूंनाही फलंदाजी करताना अडचणी येऊ शकतात.”
मोईन अली मिळवू शकतो तीन विकेट्सइंग्लंडचा फिरकीपटू मोईन अली दुसऱ्या डावात किती विकेट्स मिळवू शकतो, याबाबतही आकाशने आपले मत मांडले आहे. याबाबत आकाशा म्हणाला की, ” मोईन अलीने पहिल्या डावात चार बळी मिळवले होते. पण दुसऱ्या डावात अलीला तीन विकेट्स मिळतील, असे मला वाटते.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times